बनावट बिलांव्दारे निधीचा अपहार

बनावट बिलांव्दारे निधीचा अपहार
Dipak

मुंजवाड । वार्ताहर | Munjwad

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) ताहाराबाद (taharabad) ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथीत गैरव्यवहार प्रकरणात (Non-transaction case) हाय व्होल्टेज नाट्यानंतर रात्री उशिरा जायखेडा पोलिस ठाण्यात (Jaikheda Police Station) सरपंच (sarpanch), ग्रामविकास अधिकारी (Village Development Officer) व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे (Rural Water Supply Department) शाखा अभियंता (Branch Engineer) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (case filed) करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्याचे काम मंगळवारी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होते. ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी (Corruption) दोषी आढळलेल्या लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल होण्याची घटना जिल्ह्यात ताहाराबाद (Taharabad) येथे घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सकाळपासूनच ताहाराबाद ग्रामपंचायत व परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपअधिक्षक पोलीस, अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी दिवसभर गावात ठान मांडून होते.

ताहाराबाद गृप ग्रामपंचायतीच्या विकासासाठी 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या (Finance Commission) निधीमधून (fund) कोणतेही विकासत्मक काम न करता कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी केला असल्याच्या तक्रारी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुभाष नंदन, माजी सरपंच संदिप साळवे, ग्रामपंचायतीचे सदस्य यशवंत पवार यांनी गटविकास अधिकारी बागलाण व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी बजावले होते.

त्यानुसार चौकशी अहवालात 14 व्या 15 व्या वित्त आयोगाच्या शासकीय निधीमधून (Government funds) विकास कामे न करता खोटी बिले सादर करून निधीचा अपहार झाला असल्याचा अहवाल देण्यात आला त्यानुसार दोषी अधिकारी लोकप्रतिनिधींकडून अपहार केलेली रक्कम वसूल करा अन्यथा गुन्हे दाखल करा असा आदेश बागलाण पंचायत समितीच्या (Baglan Panchayat Samiti) गटविकास अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी काढला असतांनाही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती.

या संदर्भात सुभाष नंदन यांच्यासह साळवे व पवार यांनी आमरण उपोषण केले असता गटविकास अधिकार्‍यांनी दोषींना नोटीसा बजावून अपहार केलेल्या रकमा सात दिवसाच्या आत भरा अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्याचे सांगितले होते. मुदत संपुन देखील दोषी अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नंदन यांनी सोमवार दि. 18 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. आत्मदहणापासून नंदन यांना रोखण्यासाठी सोमवारी ताहाराबाद गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला मात्र दुसरीकडे नंदन काही संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने पंचायत समिती प्रशासन व पोलिस अधिकार्‍यांची धाकधुक अधिकच वाढली होती.

अखेर दुपारी 2 वाजता नंदन यांचा मोबाईल सुरू होताच अधिकार्‍यांनी संपर्क साधला असता दोषी अधिकारी व लोकप्रतिनीधींवर गुन्हे दाखल करा मी माझे आत्मदहन आंदोलन मागे घेतो अशी भुमिका स्पष्ट केली. सायंकाळी 6 वाजता गटविकास अधिकारी पांडूरंग कोल्हे यांनी जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये स्वतः जाऊन तक्रार दाखल केली तक्रार दाखल करण्याचे काम मंगळवारी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होते. गटविकास अधिकार्‍यांच्या तक्रारीत 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून 14 लाख 63 हजार 65 रुपयांचा अपहार झाला आहे.

हा शासकीय निधी सरपंच शितल योगेश नंदन, ग्रामविकास अधिकारी स्वप्निल ठोके, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्या संगनमताने झाला आहे. त्यांनी संगनमताने खोटी बिले सादर करून खरी भासवण्याचा प्रयत्न केला आहे. असे तक्रारीत कोल्हे यांनी म्हटले असल्याने या तिघांविरूध्द विरुद्ध भादवि कलम 420, 409, 465, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सपोनि श्रीकृष्ण पारधी हे करीत आहेत. ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या 14 व्या व 15 व्या वित्त आयोगाच्या 1 कोटीहुन अधिक शासकीय निधीचा अपहार झाला आहे.

आज फक्त 15 व्या वित्त आयोगातील निधीमध्ये अपहार केलेल्या दोषींवर गुन्हा दाखल झाला. येत्या काही दिवसात 14 व्या वित्त आयोगातील निधीचा अपहार करणार्‍या दोषींवर गुन्हे दाखल झाल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत शासनाने निधी गाव विकासासाठी पाठवला होता नागरीकांच्या समस्या सोडविणे दुरच नागरीकांसाठी आलेल्या शासकीय मलिदावर लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी डाव मारला याचा खेद वाटतो अशी प्रतिक्रिया सुभाष नंदन व माजी सरपंच संदिप साळवे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com