मालट्रक उलटून भीषण अपघात; तिघांची प्रकृती गंभीर

मालट्रक उलटून भीषण अपघात; तिघांची प्रकृती गंभीर

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

नांदगाव-औरंगाबाद रस्त्यावर (Nandgaon-Aurangabad road) ऊसतोड कामगारांची (workers) वाहतूक करणार्‍या मालट्रकला भीषण अपघात (accident) झाल्याने 24 हून अधिक ऊसतोड कामगार जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, भिमाशंकर येथून ट्रक क्रमांक एम.एच.14-सर.यू.205 कारखान्यावरुन ऊस तोडणीचे काम आटोपून हे कामगार चाळीसगाव तालुक्यातील (Chalisgaon taluka) बोढरेतांडा (Bodharetanda) येथील आपल्या घरी परतत होते. नांदगाव-औरंगाबाद रस्त्यावरील बाभुळवाडी शिवारात चालक प्रदीप प्रकाश चव्हाण याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी (Truck overturned) होऊन हा अपघात घडला. त्यात अनिल चव्हाण, विश्वनाथ गिते, विलास वाघ या तिघा गंभीर जखमींना उपचारार्थ धुळे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेणुका तांबे, प्रविण पवार, ललित चव्हाण, प्रकाश चव्हाण, सावली चव्हाण, सरला चव्हाण, पूनम चव्हाण, शैली चव्हाण, जयश्री चव्हाण, योगेश चव्हाण, राजाराम चव्हाण, चंद्रकला चव्हाण, सुवर्णा चव्हाण, बैनशी चव्हाण, काजल चव्हाण, भाग्यश्री चव्हाण, गोकुळ चव्हाण, लता चव्हाण, सौरभ चव्हाण, तुळशीराम चव्हाण, अमेदी चव्हाण (सर्व रा. बोढरे, ता. चाळीसगाव) हे ऊसतोड कामगार किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका (Ambulance) व पोलिसांच्या वाहनांतून जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात (Nandgaon Rural Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले.

अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात तातडीचे उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे (dhule), मालेगाव (malegaon), चाळीसगाव (chalisgaon) येथे पाठवण्यात आले. जखमींची संख्या जास्त असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांसह परिसरातील खाजगी डॉक्टरांनी देखील अपघातांवर उपचारासाठी मदत केली. याप्रकरणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. भूषण अहिरे हे अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com