नाशकात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

नाशकात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

नाशिक | Nashik

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यभरात वातावरण चांगलेच तापले आहे...

त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Sawarkar) त्यागाचे स्मरण करुन देण्यासाठी राज्यातील २८८ मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा (Savarakar Gaurav Yatra) काढण्याचा संकल्प केला आहे.

नाशकात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा
खासदार संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले...

या पार्श्वभूमीवर सावरकर गौरव यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत असून काल नाशिकमध्ये (Nashik) भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती. यानंतर आज पुन्हा भाजप शहर कार्यकारिणीच्या वतीने शहरात आमदार राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशांच्या गजरात भव्य सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.

नाशकात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा
GT vs DC : गुजरात-दिल्ली आज आमनेसामने

दरम्यान, यावेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, यांच्यासह शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com