फ्रीडम रॅली
फ्रीडम रॅली
नाशिक

नाशिकचा श्वास मोकळा होण्यासाठी 'फ्रीडम रॅली'

येलो स्कॉट आणि झटका डॉट ऑर्ग या संस्थांचा समावेश

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

प्रदूषणापासून स्वातंत्र्य मिळाव म्हणून देशभर सायकलिस्ट विवीध सायकल उपक्रम राबवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नाशकात सायकलिस्ट तर्फे जेहान सर्कल पासून राजीव गांधी भवन पर्यंत स्वातंत्र्य रॅली करण्यात आली.

देशभरात आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज देशभरात हजारो सायकलिस्ट #ResetWithCycling मोहिमेचा भाग म्हणून आपल्याला शहरात सायकलिस्ट साठी संसाधनांची मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशकातील सायकलिस्टने शहर प्रदूषण मुक्त व्हावं व शहरात एक चांगली आणि अभ्यासपूर्ण सायकल policy आणावी यासाठी फ्रीडम रॅली काढण्यात आली. या मोहिमेसाठी yellow scout आणि झटका डॉट ऑर्ग या संस्थांनी एकत्र येऊन एक पेटीशन केली आहेत.

आज सकाळी आयोजित केलेल्या या फ्रीडम रॅलीत अरुण भोये, गोपीनाथ मुंढे, मनोज महाले, कृतिका गायकवाड या राष्ट्रीय खेळाडूंनी ११५ किलोमीटर सायकलिंग केली. शेवटच्या टप्प्यात yellow scout ग्रुप च्या इतर सदस्यांनी त्यांना साथ दिली आणि राजीव गांधी भवनासमोर रॅली चा शेवट झाला.

संपूर्ण देशात २५ शहरातील सायकलिस्ट ग्रुप आपल्याला शहरासाठी मागण्या करत आहेत.. यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांतील सायकलिस्टनी सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत १७ हजाराहून अधिक नागरीकांनी ऑनलाईन याचिकेवर सह्या केल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com