हुतात्मा स्मारक झाले अनाथ !

जेष्ठ स्वातंत्रसैनिक वसंत हुदलीकर यांचे निधन
हुतात्मा स्मारक झाले अनाथ !

नाशिक । Nashik

स्वातंत्र्यलढ्यातील लढवय्या जेष्ठ स्वातंत्रसैनिक वसंत हुदलीकर यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा देह वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे परिवाराने दान केला.

नाशिकच्या हुतात्मा स्मारकाचे आधारवड म्ह्णून ओळख असलेले, प्रत्येकाला मदतीचा हात देणारे, क्रांतिभूमी म्हणून त्यांनी हुतात्मा स्मारक त्यांनी जपले. जिल्ह्यातील विखुरलेल्या स्वातंत्रसैनिकांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले.

मागील अनेक वर्षांपासून ते स्मारकात येऊन विविध उपक्रम राबवत. अनेक निराधार मुलांना त्यांनी आपलं करत शिक्षण दिले. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर आणि हुतात्मा स्मारक यांचे घनिष्ट संबंध आहेत. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगतायत ९५ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक वसंत (बाबा) हुदलीकर @गाडगे महाराज मठ नाशिक.

Posted by Deshdoot on Tuesday, August 14, 2018

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे आज वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. अत्यंत दुःख झाले. मुळचे समाजवादी पक्षाचे असलेले कै. वसंतराव हुदलीकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक देशातील अनेक महत्त्वाच्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील हुतात्मा स्मारकाचे ते सर्वेसर्वा होते. याठिकाणी खेड्या पाड्यातील विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुरुकुलासारखे सांभाळत होते. तसेच शहीद कुटुंबातील सदस्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा त्यांचा पुढाकार होता. महात्मा गांधीच्या विचारांची जोपासना करत आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी खर्ची केले. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ समाजसेवकाला नाशिककर कायमचे मुकले आहे. त्यांच्या निधनाने हुदलीकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय हुदलीकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

छगन भुजबळ मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com