देवळालीत बिबट्याचा मुक्त संचार

देवळालीत बिबट्याचा मुक्त संचार

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

येथील विजयनगर भागातील मातोश्री लॉन्सचे व्यवस्थापक योगेश करंजकर यांच्या राहत्या घरून बिबट्याने पाळीव कुत्रावर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण निर्माण झाले आहे...

दारणा काठी असलेल्या विजयनगर भागात बिबट्याचा वावर हा नेहमीचा झाला आहे. आत्ता थेट नागरी वस्तीत बिबट्या मुक्त संचार करू लागल्याचे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे.

करंजकर यांच्या निवासस्थानी लावलेल्या सीसीटीव्हीत बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यांच्या निवस्थानाच्या गेट वरून उडी मारत बंगल्याच्या पोर्चमध्ये असलेल्या कुत्रा बिबट्याने उचलून नेला. सकाळी हे कुटुंब जागे झाल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली.

त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला असता बिबट्याचा प्रताप समोर आला. या भागात मोठी लोकवस्ती असल्याने व बिबट्या या ठिकाणी मुक्त संचार करीत असल्याने वनविभागाने तातडीने येथे पिंजरा लावावा, अशी मागणी कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष तानाजीराव करंजकर, योगेश करंजकर यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com