एकलहरे परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार

डोंगरावरून घसरून एक बिबट्या जखमी, जेसीबीच्या सहाय्याने उचलले
एकलहरे परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार

नाशिक रोड | प्रतिनिधी Nashik

येथील एकलहरे Eklahare परिसरात आज सायंकाळी चक्क डोंगरावर चार बिबटे Leopards मुक्त संचार करीत होते मात्र यापैकी एक बिबट्याचा पाय अचानक घसरल्याने सदरचा बिबट्या डोंगरावरून खाली पडला त्यामुळे त्याचा मनका तुटल्याने तो जखमी झाला व त्याला चालता येईना परिणामी जखमी झालेल्या बिबट्याला काही नागरिकांनी बघताच जेसीबीच्या सहाय्याने उचलले व त्यानंतर सदर बिबट्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून एकलहरे परिसरातील डोंगरावर 4 बिबटे मोठ्या प्रमाणात मुक्त संचार करत असल्याचे नागरिकांनी बघितले आज सुद्धा हे बिबटे एकलहरे ड्याम जवळील डोंगरावर फिरत असताना या चार बिबट्या पैकी एका बिबट्याचा डोंगरावरून पाय घसरल्याने सदर बिबट्या खाली पडला व जखमी झाला परिणामी या बिबट्याचा मनका तुटल्याने त्याला चालता येत नव्हते दरम्यान याच परिसरात नगरसेवक विशाल संगमनेरे यांचे कर्मचाऱ्यांना हा जखमी बिबट्या दिसला .

त्यानंतर त्यांनी सदरची घटना ऋषिकेश संगमनेरे लखन मस्के रमेश चव्हाण भूषण डोंगरे यांना सांगितले ते तातडीने घटनास्थळी आले व त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले परंतु बिबट्या डरकाळ्या देत होता त्यामुळे त्याच्यासमोर कोणीही जात नव्हते त्यामुळे या बिबट्याला कसे उचलावे असा प्रश्न निर्माण झाला होता अखेर जेसीबीच्या साह्याने सदर बिबट्याला उचलण्यात आले व त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले त्यामुळे बिबट्याचे प्राण वाचले.

Related Stories

No stories found.