पांडवलेणी परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार

पांडवलेणी परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार

इंदिरानगर | वार्ताहर

शहरातील पांडवलेणीच्या (Pandavaleni) पायथ्याशी नवीन तयार झालेल्या हॉटेल रेडिसन ब्लूच्या (Hotel Radisson Blu) पाठीमागे असलेल्या मोठ्या प्लॉटमध्ये बिबट्याचा (Leopard) मुक्तसंचार झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच घटनास्थळी वनक्षेत्रपालांनी भेट देऊन पाहणी करत पुढील उपयोजना सुरू केल्या आहेत....

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल रेडिसन ब्लूच्या पाठीमागे दोन-तीन एकरावर मोठी झाडे असून याठिकाणी दुपारी बिबट्याचे काही नागरिकांना (citizens) दर्शन झाले.

त्यानंतर त्यांनी तात्काळ वनसंरक्षक दलाला (Forest Guard) ही माहिती दिली असता वनक्षेत्रपाल विजयसिंह पाटील (Forester Vijaysinh Patil) यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा शोध घेतला. त्याठिकाणी फटाके फोडले परंतु बिबट्या दिसला नाही.

तसेच बिबट्या त्या परिसरात आजूबाजूला असल्याची शंका येथील रहिवाशांनी व्यक्त केल्यामुळे येथे पिंजरा (Cage) लावण्यात आला असून पुढील सूचना रहिवाशांना देण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, येथील रस्त्यावर जवळच एक मोठा प्रकल्प असून आजूबाजूला मोठी रहिवासी वस्ती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com