सप्तशृंगीगड ट्रस्टतर्फे ग्रामस्थांना मोफत भोजन

सप्तशृंगीगड ट्रस्टतर्फे ग्रामस्थांना मोफत भोजन

आरोग्य जनजागृतीसाठी विविध उपक्रम

नांदुरी । Nanduri

महाराष्ट्रातील अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे कळवण तालुक्यातील सप्तशृंगीगड येथील सप्तशृंग देवी संस्थानच्यावतीने गरजू व ग्रामस्थांना दोन वेळच्या मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे.

गेल्या वर्षभरात करोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक विविध उपक्रम राबवित आहे. त्याच बरोबर विश्वस्त संस्थेच्या धर्मार्थ रुग्णालयातून गरजूंना औषधोपचार, गरज पडल्यास तत्काळ रुग्णवाहिका तसेच सप्तश्रुंग देवी संस्थान व ग्रामपंचायत सप्तशृंगी गड यांच्या संयुक्त विद्यमाने गडावरील देवीचे मंदिर बंद असल्याने येथील बहुतांश नागरिकांचा रोजगार बुडल्यामुळे तसेच उदरनिर्वाहसाठी दुसरे साधन नसल्याने येथील गरजू व ग्रामस्थांना दोन वेळच्या भोजनाची देखील व्यवस्था केली आहे.

त्याचप्रमाणे कोविड 19 साठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व धर्मदाय आयुक्त यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सप्तशृंग देवी संस्थानने एकवीस लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आले आहे.

सद्यस्थितीत करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कळवण तालुक्यातील आरोग्य, पोलिस, महसुल विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना विश्वस्त संस्थेच्या वतीने करोना किट वाटप करण्यात आले. करोना विषाणू जनजागृती अभियानात आतापर्यंत विश्वस्त संस्थेने जवळपास 50 ते 55 लाख रुपये खर्च केल्याचे समजते.

धर्मदाय आयुक्त नाशिक यांच्या बरोबर अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या चर्चेनूसार 25 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यासाठी सकारात्मक चर्चा झालेली आहे, मात्र सद्यस्थितीत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध होत नाही. लवकरात लवकर उपलब्ध करून जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात येणार आहे. 5 बायप्याप मशीन खरेदी करून कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयस देण्याचे विश्वस्त मंडळाने ठरविले आहे.

तहसीलदार कापसे यांनी सुचविल्यानुसार कळवण कोविड सेंटरसाठी आवश्यक त्यावेळेस अन्न पॅकेटस व पाणीपुरवठा करण्याचे नियोजीत केले आहे. गोपाळखडी येथील कोविड सेंटरसाठी संस्थेच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून चालू आहे.

शासनाच्या आदेशाने पुन्हा एकदा धार्मिक स्थळे बंद असल्याने येथील सप्तशृंगी देवीचे मंदिर देखील बंद आहे. त्यामुळे पूजा साहित्य विक्री करणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचा एकमेव रोजगार बंद झाल्यामुळे उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी गडावरील स्थानिक रहिवाशी, ग्रामस्थ, गरजू व्यक्तीसाठी विश्वस्त मंडळाने मोफत अन्नदान करण्याचे यापूर्वीच नियोजन केले आहे. मात्र प्रसादालयातील कर्मचारी करोना बाधित असल्याने निर्णय घेण्यात आला नाही. मात्र लवकरच प्रसादालय सॅनिटायझर करून अन्नदान करण्याचे विश्वस्त मंडळाने ठरविले आहे.

गडावरील गरजू व्यक्ती, स्थानिक रहिवासी, ग्रामस्थांच्या प्रश्नांना प्राथमिकता देत कळवण तालुक्यासाठी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण करता यावे, यासाठी विश्वस्त मंडळाने वैद्यकीय उपकरणे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- अ‍ॅड. ललित निकम, विश्वस्त, सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com