एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये मोफत जेवण

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये मोफत जेवण

गुरू हनुमान आखाडा पहिलवांनाचा उपक्रम

देवळाली कॅम्प । Deolali Camp

गेल्या १५ दिवसापासून एस.एम.बी.टी.हॉस्पिटल येथील कोविड रुग्णांसह त्यांचे नातेवाईकांना साकुर फाटा येथील गुरू हनुमान आखाडा यांचे वतीने मोफत जेवणाचे डबे मोफत पुरविले आहेत.

वंजारवाडीचे सरपंच पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे यांनी सामाजिक भावनेतून हा उपक्रम सुरू करताना गरजूंपर्यंत योग्यवेळी सकस आहार पोचणे हा मुख्य उद्देश ठेवला आहे.

पै.ज्ञानेश्वर शिंदे यांनी भारतील लष्करी सेवेत असतांना लष्करी कुस्तीचे आखाडा गाजवत ऑल इंडिया चॅम्पीयन मिळविली आहे. सेवानिवृत्ती नंतर कुस्तीची आवड म्हणुन त्यांनी स्वःर्खातुन साकुर फाटा येथे 'गुरू हनुमान आखाडा व्यायाम शाळा' सुरू केली, राज्यभरातुन पहिलवान या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत.एस एम बी टी हॉस्पिटल हे शहरापासून 22 की मी वर असून जिल्हाभरातुन मोठ्या संख्यंने रूण्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत.

करोना काळात या ठिकाणी फ्रंटवर्करमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक, रूण्ण व त्यांचे नातेवाईक यांचे जेवणांचे हाल होत असल्याचे लक्षात आले. त्यातून शिंदे यांनी व्यायाम शाळेतील पहिलवान यांना देण्यांत येणारा सकस आहार पुरविण्या बरोबरच रूनघालयात देखील जेवण पुरविण्याचा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com