हजारावर महिलांची मोफत कर्करोग तपासणी

रोटरी-ग्रामपंचायतींसह विविध संस्थांचा कसमादेत उपक्रम
हजारावर महिलांची मोफत कर्करोग तपासणी

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

रोटरी क्लब ऑफ मालेगाव (Rotary Club of Malegaon) मिडटाऊन (Midtown) व स्थानिक ग्रामपंचायती, विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कसमादे नांदगाव (nandgaon) भागातील महिलांसाठी मोफत गर्भाशय (The uterus) व स्तन कर्करोग (Breast cancer) तपासणी शिबिरांचे आयोजन (inspection camps) केले गेले. 13 शिबिरातून सुमारे 1 हजारावर महिलांची तपासणी केली गेली.

दैनंदिन जीवनात महिलांतर्फे घराची आणि इतरांची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे (health) मात्र दुर्लक्ष होते. त्यामुळे गेल्या काही वर्षात महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. गर्भाशय व स्तन कॅन्सरचे प्रमाण अधिक असल्याचे तपासणीअंती उघड होत आहे. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब (Rotary Club) अमरावतीतर्फे (amravati) अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने (Sophisticated machinery) सुसज्ज व्हॅनमधून महिलांच्या गर्भाशय व स्तनाच्या कॅन्सर तपासणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

तपासणी व्हॅन मालेगाव (malegaon) परिसरासाठी उपलब्ध झाल्याने रोटरी क्लब मिडटाऊनतर्फे शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन महिलांची तपासणी केली गेली. कसमादेना भागातील दाभाडी, तळवाडे, नांदगाव, डोंगरगाव, दहिवड, मेशी, निंबोळा, उमराणे या गावांमध्ये ग्रामपंचायतींसह विविध पक्ष-संघटनांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती रोटरी मिडटाऊनचे मेमोग्राफी समन्वयक उदय राहुडे यांनी दिली.

या पंधरवड्यात तेरा तपासणी शिबिरे घेतली त्यामध्ये रोटरी क्लब मिडटाऊन 9, रोटरी क्लब मालेगाव व रोटरी क्लब फोर्टतर्फे प्रत्येकी 2 शिबिर घेण्यात आले. कॅन्सर तपासणीसाठी डॉ. ऐश्वर्या गायगोले, उदय निंभोरकर, तंत्रज्ञ आरती जांभुळकर, निलिमा वानखेडे आदीसह वैद्यकीय पथकाने काम पाहिले. शिबीरांच्या यशस्वीतेसाठी रोटरी-इनरव्हील क्लबसह ग्रामपंचायत पदाधिकारी-सदस्य, विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती समन्वयक राहुडे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com