संमेलनासाठी दर पंधरा मिनिटांनी मोफत बसेस

संमेलनासाठी दर पंधरा मिनिटांनी मोफत बसेस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहराच्या विविध भागातून संमेलनस्थळी 94th All India Marathi Literary Convention येणार्‍या बसेसचे 12 मार्ग व त्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.संमेलन स्थळावर जाण्यासाठी सकाळी आठ वाजेपासून दर 15 मिनिटांनी बसेस उपलब्ध असणार आहेत. शहराच्या विविध भागातून येणार्‍या संमेलनाच्या बसेस महामार्ग व निमाणी बसस्थानकावर Mahamarg & Nimani Bus Depot थांबणार आहेत.

या दोन्ही स्थानकांवरूनही साहित्यप्रेमींना घेतले जाणार आहे. विविध भागातून आलेले साहित्यिक महामार्ग व निमाणी बसस्थानकांवर थांबतील व कुसुमाग्रजनगरीकडे जाणार्‍या दुसर्‍या बसमध्ये बसतील. महामार्ग बसस्थानकातून बस सर्व्हिसरोडने कावेरी हॉटेल, द्वारका येथे किमान 10 ते 15 मिनिटे थांबेल. निमाणी बसस्थानकातून बस आडगाव नाकामार्गे सर्व्हिसरोडने कुसुमाग्रजनगरी Kusumagaraj Nagari येथे जातील. प्रत्येक थांब्यावर बस किमान पाच मिनिटे थांबणार आहे. परतीच्या प्रवासात साहित्याप्रेमींना निमाणी बसस्थानक व महामार्ग बसस्थानकावर सोडले जाईल.

नाशिक शहराच्या विविध विभागातून येणार्‍या संमेलनाच्या बसेस महामार्ग बसस्थानक येथे थांबतील. तेथे त्या गाडीतील साहित्यप्रेमी उतरतील व कुसुमाग्रजनगरीकडे जाणार्‍या दुसर्‍या बसमध्ये बसतील.

महामार्ग बसस्थानकातून बस सर्व्हिसरोडने कावेरी हॉटेल, द्वारका येथे किमान 10 ते 15 मिनिटे थांबेल.

निमाणी बसस्थानाकातून बस आडगाव नाकामार्गे सर्व्हिसरोडने एमईटी येथे जातील.

नाशिकरोड रेल्वे / बसस्थानकापासून येणार्‍या प्रत्येक स्टॉपवर बस किमान 5 मिनिटे थांबेल.

परतीचा मार्ग याचप्रमाणे उलट्या क्रमाने असेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com