अवनखेड / लखमापूर । वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, अवनखेड, पाडे येथील शेतकर्यांना परप्रांतीय द्राक्ष व्यापार्याने सुमारे साडेदहा लाख रुपयांचा गंडा घालून शेतकर्यांची 10 लाख 40 हजार 705 रुपयांची द्राक्षे घेऊन व्यापार्याने पोबारा केल्याने फसवणूक झाली आहे.

लखमापूर, अवनखेड, वरखेडा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाने आपल्या शेतात पिकवलेली द्राक्ष महबूब खान व बच्चन बेग (रा. ककराळा, ता. बदायू, उत्तरप्रदेश) येथील व्यापार्यांना दिली होती. द्राक्ष काढणीनंतर पाठविलेल्या द्राक्ष मालांचे पैसे आणण्यासाठी शेतकरी हे व्यापारी राहत असलेल्या पेढीवर गेले असताना हे दोन्ही द्राक्ष व्यापारी दोन ते तीन दिवसांपासून गायब असल्याची माहिती मिळाली. त्यांचा मोबाईल बंद असल्याने शेतकर्यांनी वणी पोलीस ठाण्यात जाऊन त्या दोन्ही व्यापार्यांविरोधात तक्रार दिली.

दुसर्या घटनेत सुकदेव नामक द्राक्ष व्यापार्याने लाखो रुपयाला गंडा घालून पलायन केले आहे. त्या व्यापार्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मंगेश विष्णू जाधव 1 लाख 50 हजार रुपये, गणेश कामाले 1 लाख 20 हजार रुपये, अमोल मोगल 1 लाख 50 हजार, किरण चव्हाण 1 लाख 70 हजार, किशोर कुशारे 1 लाख 80 हजार, दीपक पेलमहाले 1 लाख 29 हजार 705 रुपये, नामदेव पगार 1 लाख 40 हजार अशा रक्कम आहे.