व्यापार्‍याचा द्राक्ष उत्पादकास गंडा

 व्यापार्‍याचा द्राक्ष उत्पादकास गंडा

पालखेड मि.। वार्ताहर Palkhed Mirchiche

द्राक्षपंढरी ( Grapecity )म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंपळगाव बसवंत ( Pimpalgaon Basvant ) परिसरातील द्राक्ष उत्पादकास पुन्हा एकदा व्यापार्‍याकडून फसवणुकीचा (Fraud from traders ) फटका बसला आहे. पिंपळगाव परिसरातील लोणवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याच्या 90 क्विंटल द्राक्षमालाचे 4 लाख 10 हजार रु. बुडवून कोलकाता येथील व्यापारी फरार झाल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये ( Grapes Growers ) संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात ( Pimpalgaon Police Station ) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव नगरीत द्राक्षबागांना अवकाळी पावसाचा दणका बसण्याचे यंदाचे चौथे वर्ष आहे. गारपीट, अतिवृष्टी, कडाक्याची थंडी आदी आव्हाने द्राक्ष उत्पादकांसमोर असतांना कर्ज काढून, महागडी औषधे फवारून हार न मानता शेतकर्‍यांनी द्राक्षबागा फुलविल्या.

यंदाच्या द्राक्ष हंगामाने अर्धा टप्पा पार केला असतांना शेतकरी फसवणुकीचे प्रकार पुन्हा समोर येवू लागले आहेत. व्यापारी मोहम्मद रुस्तम उर्फ एमडी नवाब (मूळ रा. कोलकाता, ह.मु. मुस्लिम गल्ली, पिंपळगाव बसवंत) यांनी लोणवाडी येथील द्राक्ष उत्पादक रामदास निवृत्ती जाधव यांच्या 90 क्विंटल द्राक्षमालाची खरेदी केली.

या मालाची रक्कम मागितली असता टाळाटाळ करत व्यापारी शहरातून फरार झाला. याबाबत रामदास जाधव यांच्या फिर्यादीनुसार पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.