
नाशिक | Nashik
शहरातील एकाला ऑनलाईन पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून टास्कची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तब्बल २ लाख १५ हजार ११६ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे...
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) मोबाईल क्रमांकासह विविध खात्याच्या धारकावर फसवणुकीचा गुन्हा (Crime of Fraud) दाखल झाला आहे. ही घटना ११ ते १९ सप्टेंबर २०२३ या दरम्यान घडली आहे.
दरम्यान, इंस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरातीद्वारे ऑनलाईन पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून वेळोवेळी दिलेली टास्कची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी एवढी मोठी रक्कम विविध युपीआयच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली.