<p><strong>नाशिक रोड l Nashik road (प्रतिनिधी) </strong></p><p>परिसरातील नागरिकांशी व सराफाशी ओळख करून मोठमोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून सुमारे 28 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला गुजरात मधून उपनगर पोलिसांनी अटक केली.</p>.<p>त्याच्याकडून 28 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, साडेआठ लाख रुपये, त्याच्या नावे बँकेत असलेले साडेचार लाख रुपये असा सुमारे 27 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून संशयित आरोपी गुजरात मध्ये स्थायिक झाला होता. दिनेश कुमार रामाधर मिश्रा असे संशयित आरोपीचे नाव आहे.</p>