शेतकऱ्यांची १६ लाखाची फसवणूक; गुन्हा दाखल

Fraud (फसवणुक)
Fraud (फसवणुक)

नाशिक । Nashik

शेतकऱ्यांचा (Farmers) टोमॅटोचा (Tomato) माल लिलावात खरेदी करून त्याचे पैसे न देता पती-पत्नीने १६ लाख २४ हजार २२२ रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र बद्रीनाथ तुपे (Ravindra Badrinath Tupe) (५१,रा. श्रीपाद अपार्टमेंट, तिडके नगर, उंटवाडी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पुष्पा विलास शिंदे (Pushpa Vilas Shinde) (४०) विलास बाबुराव शिंदे (Vilas Baburao Shinde) (दोन्ही रा. फ्लॅट नंबर १५ सोलार सोसायटी, नवरंग मंगल कार्यालय, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक) यांनी ज्ञानेश्वर डोमसे व इतर शेतकऱ्यांचा टोमॅटोचा माल लिलावाद्वारे खरेदी केला त्याची रक्कम १६ लाख २४ हजार २२२ रुपये इतकी झाली होती परंतु शिंदे दाम्पत्याने ती देण्यास टाळाटाळ करत शेतकऱ्यांची फसवणूक केली.

दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी एस.जी. डंबाळे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com