
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
डिझेल भरण्यासाठी दिलेल्या पावत्या गायब करून त्या वाहनांमध्ये भरलेल्या डिझेलचे पैसे आपसात वाटून घेऊन पेट्रोल पंप चालकाची सुमारे 72 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीन जनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मुजीब हबीब पठाण नायगाव रोड शिंदे यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी त म्हटले आहे की आपला शिंदे गाव येथे जनसेवा ट्रान्सपोर्ट पेट्रोलपंप ( Nanseva Petrol Pump)असून या पंपावर अलमेश राजमोहम्मद सय्यद ,शरफट अली अजगर अली शेख, करामत अली अजगर अली शेख हे कामाला असून अलमेश हा अकाऊंटट आहे.
या तिघांनी संगनमत करून पेट्रोल पंपावर डिझेल भरणा करण्यासाठी येणाऱ्या हैदराबाद रोड करिअरच्या काही वाहनांच्या डिझेल भरण्यासाठी दिलेल्या पावत्या गायब करून त्या गाड्यांमध्ये भरलेल्या डिझेलचे पैसे आपसात वाटून घेऊन आपली 72 लाख 15 हजार 946 रुपयांची फसवणूक केली असेही तक्रारीत म्हटले आहे. या बाबत पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शेळके हे करीत आहे.