
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रतून (Bank of Maharashtra) हातचलाखीने वयोवृद्धाकडून १९ हजार ५०० रुपये लंपास (Stolen) केल्याची घटना घडली आहे. बँकेमध्ये झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव (Nalegaon) येथील विश्वनाथ एकनाथ बोंबले यांनी दिंडोरीतील भारतीय स्टेट बँकेतून आपल्या खात्यातून ५० हजार रुपये काढले. ते पैसे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत त्यांच्याच खात्यात भरण्यासाठी गेले असता तेथील बँक कर्मचार्यांनी खाते बंद झाले असून काही कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी सांगितले. त्यानुसार बोंबले यांनी कागदपत्रांची पूर्तता केली.
त्यानंतर पैसे भरणा (Money) करण्यासाठी स्लिप भरण्याबाबत बँक कर्मचार्यांनी सांगितले. त्यावेळी बोंबले हे बँकेची भरणा पावती लिहीत असतांना दोन युवक त्यांच्याजवळ आले. त्यावेळी त्या नोटावरील नंबरही पावतीवर लिहावे लागेल म्हणून त्यांच्या हातातील पैश्यांचा बंडल फोडून हातचलाखीने १९ हजार ५०० रुपये लंपास केले. ही बाब भरणा करतांना बोंबले यांच्या लक्षात आली असता तो पर्यंत संबंधित युवकांनी (Youth) बँकेतून पोबारा केला होता. यानंतर बँकेतील सीसीटीव्ही तपासले असता संबंधित युवकांनी वयोवद्ध बोंबले यांच्याकडून हातचलाखीने पैसे लंपास केल्याचे लक्षात आले.
दरम्यान, त्यानंतर बोंबले यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात (Dindori Police Station) चौकशी अर्ज दाखल केला असून सीसीटीव्ही फूटेजच्या (CCTV Footage) आधारे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय कौवटे व पोलिस तपास करत आहेत.