Nashik : नोकरीचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक

Nashik : नोकरीचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नोकरी (job) लावून देण्याचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक (Fraud) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed case) करण्यात आला आहे...

Nashik : नोकरीचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक
मनसेला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वाती जनार्दन गामणे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) यासंदर्भात तक्रार दिली आहे. गामणे व त्यांचे कुटुंबीय हे सामनगाव रोड सिन्नर फाटा नाशिकरोड येथे राहत असताना याठिकाणी राहत असलेले नंदकिशोर काशिनाथ गरकळ, सुमन नंदकिशोर गरकळ व ऋषिकेश नंदकिशोर गरकळ यांनी स्वाती गामणे यांचा भाऊ विकास गामणे यास नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून स्वाती व त्यांच्या आईकडून वेळोवेळी चेक व ऑनलाइनद्वारे ट्रान्सफर करून सुमारे २० लाख ३६ हजार रुपये घेतले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik : नोकरीचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक
श्री म्हसोबा महाराज यात्रेला सुरुवात

मात्र, त्यानंतर पैसे (Money) घेऊन सुद्धा नोकरी दिली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजताच स्वाती गामणे यांनी तात्काळ नाशिकरोड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.

Nashik : नोकरीचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक
द्राक्ष निर्यातदार कंपनीच्या व्यवस्थापकाचा अपघाती मृत्यू
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com