गॅस जोडणीच्या नावाखाली फसवणूक

गॅस जोडणीच्या नावाखाली फसवणूक

ननाशी । वार्ताहर | Nanashi

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) धोंडाळपाडा येथे सरकारी योजनेतून गॅस जोडणी (Gas connection) मिळवून देतो, अशी बतावणी करून अनोळखी युवक आणि युवतीने गावातील 25 ते 30 नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपये जमा करून फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांकडून समजलेली माहिती अशी की, काल दुपारी 12 ते 1 वाजेचया दरम्यान एक अनोळखी युवक आणि युवतीने गावात येऊन सरकारी योजनेतून गॅस एजन्सी (Gas Agency) मार्फत गॅस शेगडी, सिलेंडरसह (cylinder) नवीन गॅस जोडणी मिळवून देतो आता 500 रुपये भरून द्या आणि पुढील पंधरा दिवसांत गॅस जोडणी होईल, असे सांगत स्वतःजवळ असलेल्या एक फॉर्मवर लाभार्थ्यांचे नाव, आधार नंबर (Aadhaar Number), मोबाईल नंबर (mobile number) भरून घेतले आणि प्रत्येकी 500 रुपये गोळा केले.

500 रुपये घेतल्याची कुठलीही पावती ग्रामस्थांना दिली नाही. यात काही नागरिकांनी रोख स्वरूपात तर काहींनी ऑनलाइन (online) पद्धतीने या जोडगोळीला पैसे अदा केले आहेत. त्यांनतर गावातील काही जागरूक युवकांच्या लक्षात ही बाब आल्यांनातर त्यांनी या जोडगोळीला कोणती शासकीय योजना (Govt Scheme) आहे ? दिंडोरीत तुमचे कार्यालय कोठे आहे? अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी थातुरमातुर उत्तरे देत चुकीचा पत्ता दिला.

ज्यावेळी युवकांनी दिंडोरीत (dindori) सदरील पत्त्याबाबत चौकशी केली असता या जोडगोळीने सांगितलेले ठिकाण अस्तित्वात नसल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान गावातील युवक खोलवर चौकशी करत असल्याचे निदर्शनास येताच या जोडगोळीने ज्यांचे पैसे जमा झाले ते घेऊन गावातून पळ काढला. त्यांनतर युवकांनी या जोडगोळीने नागरिकांना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून पाहिले असता त्यांनी दिलेले मोबाईल नंबरही बंद येत होते.

दरम्यान परिसरातील इतर गावांमध्येही शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगत कोणी अनोळखी व्यक्ती पैसे गोळा करतांना आढळून आल्यास ग्रामस्थांनी अनोळखी व्यक्तींना पैसे देऊ नये आणि तातडीने स्थानिक पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करावा तसेच प्रशासनाने याची दखल घेत आदिवासी भागात फिरून ग्रामस्थांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेणार्‍या जोडगोळीचा बंदोबस्त करावा असे आवाहन धोंडाळपाडा येथील पोलीस पाटील भारती हिंडे आणि बाडगीचा पाडा येथील पोलीस पाटील शंकरराव तुंगार यांनी केले आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com