ऑनलाईन नोकरी शोधने पडले महागात

ऑनलाईन नोकरी शोधने पडले महागात

शिक्षिकेला साडेतीन लाखांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी

ऑनलाईन नोकरी शाधणे एका शिक्षिकेला महागात पडले असून भामट्यांनी त्यांच्याकडून एटीएम (डेबीट कार्डची) माहिती घेऊन तब्बल साडेतीन लाख रूपये परस्पर काढून घेत लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी प्रिया संजय निकुंभ (रा. समर्थनगर, म्हसरूळ - मखमलाबाद लिंकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार निकुंभ या ऑनलाईन विविध संकेत स्थळांवर नोकरी शोधत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांना मोबाईलवर कॉल आला.

नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावरून बोलत असल्याचे सांगून चांगल्या नोकरीचे अमिष दाखवत निकुंभ यांच्याकडून डेबिट कार्डची माहिती संकेस्थळावर भरण्यास सांगितली. या माहितीचा वापर करून त्यांच्या खात्यावरून परस्पर ३ लाख ४७ हजार ५९० रूपये ऑनलाईन काढून घेण्यात आले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक देवराज बोरसे करत आहेत.

दिवाळी तसेच विविध सनांच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन वस्तु मागवण्याचे प्रमाण वाढते. याचा गैरफायदा सायबर भामटे घेत असतात. यामुळे नागरीकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी. आपले बँक खाते, डेबीट तसेच क्रेडीट कार्डची माहिती कोणालाही देऊ नये तसेच कोणताही ओटीपी इतरांना शेअर करून नये अशी काळजी घेण्याचे आवाहन सायबर पोलीसांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com