यशवंत मंडईसाठी चौथ्यांदा निविदा

स्मार्ट सिटी सीईओंचे व्यावसायिकांना आश्वासन
यशवंत मंडईसाठी चौथ्यांदा निविदा

नाशिक । प्रतिनिधी .Nashik

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठमधील पार्किंगची parking समस्या निकाली काढण्यासाठी यशवंत मंडई येथे प्रस्तावित पार्किंगसाठी येत्या आठ दिवसात निविदा निघणार आहे. गेल्या आठ वर्षात अनेक चढ उतारानंतर चौथ्यांदा हि निविदा निघणार This will be the fourth tender असल्याने आता तरी हे काम होईल आणि रविवार कारंजा मोकळा श्वास घेईल अशी आशा नाशिककर व्यक्त करत आहे.

रविवार कारंजा आणि पंचवटीतील दिंडोरी नाका येथे सुरु असलेल्या जंक्शन ट्रायल रनच्या विरोधात शहरातील व्यावसायिकांचे शिष्टमंडळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी स्मार्ट सिटी सीईओंची भेट घेतली. त्यावेळी सीईओ सुमंत मोरे यांनी पदाधिकारी आणि व्यावसायिक यांना आश्वासन दिले.

पूर्वपिठीका

यशवंत मंडईच्या जागेवर पार्किंग उभे करण्यासाठी सन 2014-15 मध्येतत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम आणि तत्कालीन नगरसेविका कै. सुरेखा भोसले यांनी पाहणी करत 2 मजले खाली आणि 6 मजले वरती अशी आठ मजल्याच्या पार्किंगला तत्वतः मान्यता दिली. त्यावेळी मुख्य 21 भाडेधारकांसांठी जागा आणि उर्वरित जागेत मोठी रॅम्प पार्किंग असे नियोजन केले होते.

त्यानंतर आलेल्या स्मार्ट सिटी कंपनीकडे यशवंत मंडई, कालिदास कलामंदिर अशी कामे दिली गेली. त्यांनी देखील कामांचा तपशील बघता नियोजन करायला सुरुवात केली. मात्र, आमदार निधीतून राज्य शासनाकडून काही अनुदान मंजूर करून हे काम करावयाचे ठरले. कालांतराने हे अनुदान दुसर्‍याच काही विकासकामांना वापरले गेल्याने पार्किंगचे काम पुन्हा स्मार्ट सिटीकडे Smart City आले.

दरम्यान, तत्कालीन स्मार्ट सिटी सीईओ यांनी एका सल्लागार कंपनीकडे सल्ला मागितला. या कंपनीने हायटेक पार्किंगवर जोर देत मेकॅनिकल पद्धतीचा आराखडा दिला. तो मंजूर करत स्मार्ट सिटीने निविदा काढली. मात्र याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. दोन महिन्यानंतर पुन्हा तीच निविदा काढली तरी त्याला प्रतिसाद मिळाला नाही. 6 महिन्यानंतर देशातील मोठ्या कंपन्यांना निमंत्रित केले. त्यानंतर सुधारणा करत निविदा काढली तरीही कोणीही हे काम करण्यास पुढे आले नाही. यामध्ये 3 वर्षे वाया गेली.

व्यावसायिकांनी लावले पोस्टर

गेल्या चार दिवसांपासून स्मार्ट सिटी अंतर्गत जंक्शन विकासासाठी ट्रायल रन सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रविवार कारंजा येथे ही रन घेण्यात येत असल्याचे अतोनात वाहतूक कोंडी होत आहे. येथील नागरिक व व्यावसायिकांना विश्वासात न घेता स्मार्टसिटीकडून काम केले जात असल्याचा आरोप करत रविवार करंजाचा नेहरू चौक होऊ नये असे फलक आता याठिकाणी झळकवले जात आहेत.

येथील ट्रायल रन त्यामुळे वाहतुकीचा पुरता फज्जा उडालेला असून नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यातच व्यापारी महासंघाने तीव्र निषेध नोंदवत काल सकाळी (दि.15) स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्या भेटीसाठी ते निघाले आहेत.

दरम्यान, शहरातील जुनी बाजारपेठ असलेल्या या रविवार कारंजाची मुख्य समस्या ही पार्किंगची आहे. येथे असलेल्या यशवंत मंडई येथे प्रस्तावित वाहनतळ आहे, त्याचे काम प्राधान्याने करायचे सोडून नवनवीन प्रकल्प हाती घेतला जात आहे.

या जंक्शन विकास नावाच्या स्मार्ट सिटीच्या कामातून रविवार कारांजचे वाटोळे आम्हाला करायचे नाही. शहराच्या स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेतला असता रविवार कारंजावर कोणतेही काम व्यावसायिकांना विश्वासात घेतल्याशिवाय करू देणार नाही अशा पावित्र्यात येथील नागरिक आणि व्यावसायिक असल्यामुळे स्मार्ट सिटीचे हे काम कसे पूर्ण होणार याकडे लक्ष लागून आहे.

यशवंत मंडई येथे पार्किंगचे काम सुरु होत नाही तोवर स्मार्ट सिटीचे इतर कोणतेही काम आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या कामाला विरोध आहे. महात्मा गांधी रोड येथे देखील राजेबहाद्दर हॉस्पिटलजवळ असलेल्या भूखंडावर बहुमजली पार्किंग केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.

सचिन भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

आम्ही स्मार्ट सिटीच्या सर्व कामांना मदत केलेली आहे. जंक्शन विकास ट्रायल रनमुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. तेथे काही करण्यापूर्वी यशवंत मंडई येथे पार्किंग करावी. जंक्शनच्या कामामुळे व्यावसायिक आणि नागरिक यांचा रोष निर्माण होऊन ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.

वैशाली भोसले, नगरसेविका

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com