बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका ठार

बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका ठार

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

बिबट्याच्या हल्ल्यातील (Leopard Attack) चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून याबाबत हळहळ व्यक्त होत आहे...

तालुक्यातील जुने धागुर परिसरात (Dhagur Area) असलेल्या शेतावर काम करणाऱ्या मजुराच्या चार वर्षीय मुलीला बिबट्याने झडप घालून तिला उचलून नेल्याची घटना घडली होती. या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.

आळंदी धरणालगत असलेल्या जुने धागुर येथील शेतकरी विलास बाळासाहेब माळी यांच्या मजुरांच्या शेडमध्ये गुजरात वरून शेतमजुरीसाठी आलेले मजूर राहतात. सोयाबीनच्या शेतालगत खेळत असलेल्या कृतिका विठ्ठल वड (4, रा. वाढोली, सुतारपाडा, ता. कापुरडा, जि. वलसाड) या मुलीवर बिबट्याने (Leopard Attack) अचानक हल्ला करून तिला फरफटत नेले.

घटना मुलीच्या आईसमोर घडली. परिसरातील शेतकरी व गावकरी घटनास्थळी जमा झाले. घटनेबाबत वनविभाग (Forest Department) व शासकीय यंत्रणेला माहिती देण्यात आली . वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता मुलीचा शोध वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी सुरु केला. परंतु रात्री अंधार असल्यामुळे कार्यात अडथळा निर्माण झाला.

रात्री परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवूनदेखील मुलीचा शोध लागला नव्हता. सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केल्यानंतर वनविभागाने बिबट्यांच्या पावलावरून माग काढत घटनास्थळावरून जवळच एका उसाच्या शेतात या मुलीचा मृतदेह आढळून आला.

बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका ठार
चार वर्षीय बालिकेवर बिबट्याचा हल्ला

वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह शव विच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविला. बिबट्याचा माग काढण्यासाठी वन विभागाच्या वतीने मोहीम राबविण्यात आली असून परिसरात पिंजरे आले आहे.

या परिसरात आठवडाभरात बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना असून ८ दिवसापूर्वी या ठिकाणापासून जवळच असणाऱ्या वाडगाव शिवारात ही एक मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे.

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी या परिसरातून होत आहे. दिंडोरी वनपरिक्षेत्रच्या वन अधिकारी पूजा जोशी व नाशिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या मुलीच्या शोधासाठी मोहीम राबवली होती. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.