चार वर्षीय बालिकेवर बिबट्याचा हल्ला

चार वर्षीय बालिकेवर बिबट्याचा हल्ला

वनविभागाकडून बालिकेला शोधण्याची मोहिम सुरु

ओझे | वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्यातील Dindori Taluka जुने धागुर शिवारात Old Dhagur Shivar एक शेतमजुराच्या चार वर्षीय बालिकेला सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्याने leopard हल्ला करत पळविण्याची घटना घडली असून वनविभाग Dept of forest व ग्रामस्थ बालिकेचा शोध घेत आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की जुने धागुर येथील एक द्राक्ष उत्पादक शेतकरी माळी यांच्या शेतात काम करण्यासाठी वनोली सुतारपाडा गुजरात येथील काही मजूर शेतमजुरीस आले असून रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास शेतावरील शेड मध्ये सदर मजूर स्वयंपाक करत असताना एक बिबट्या तेथे येत त्याने एक चार वर्षीय बालिकेवर हल्ला करत तिला आळंदी धरणाच्या जंगल दिशेने घेऊन गेला या घटनेनंतर बालिकेची आई व इतर नातलगांनी टाहो फोडत तिचा शोध सुरू केला .

ग्रामस्थांनी पोलीस व वन प्रशासनास माहिती दिली पोलीस व वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली मात्र उशिरापर्यंत बालिकेचा शोध लागला नसल्याचे वृत्त आहे.

Related Stories

No stories found.