भिंत कोसळून चार वर्षीय बालिका दगावली

भिंत कोसळून चार वर्षीय बालिका दगावली

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

घराच्या पाण्याची टाकीची भिंत (Water Tank Wall) कोसळून चार वर्षीय मुलीचा दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरसीपरवीन जमील अक्तर अंसारी ( वय ४ रा एकता ग्रीन सोसायटी, दोंदे मळा पाथर्डी फाटा) असे मृत मुलीचे नाव आहे. पाथर्डी फाटा (Pathardi Phata) परिसरातील अमृता नगर भागात.सकाळी 11 वाजेच्या सुमारास आरसीपरवीन व तिचा दोन वर्षाचा लहान भाऊ तिच्या आईसोबत पाण्याच्या टाकी जवळ ब्रश करत असतांना अचानक पाण्याच्या टाकी ची भिंत अंगावर कोसळल्याने दोघे बहीणभाऊ भिंतीखाली दबले गेले.

या घटनेत लहान भावाला काढण्यात यश आले. मात्र आरसीपरवीनच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

त्यांचे मूळ गाव हे बिहार राज्यातील (Bihar State) असून ते पाथर्डी फाटा दोंदे मळा येथे वास्तव्यास होते. आरसीचे वडील हे एका खासगी कंपनीय काम करून उदरनिर्वाह करत होते.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास श्रीपाद परोपकारी (PI Shripad Paropkari) यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेख करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com