चारचाकीची सायकलस्वाराला जोरदार धडक; १४ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू

अपघात | Accident
अपघात | Accident

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चार चाकी (Four Wheeler) गाडीने धडक दिल्यामुळे सायकलस्वार १४ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला...

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार कमलेश प्रकाश देशमुख (Kamlesh Prakash Deshmukh) (३०,रा. फ्लॅट नंबर ६, दर्पण रेसिडेन्सी, शिंदे नगर, कॅनॉल रोड, पंचवटी, नाशिक) यांचा चुलत भाऊ साई मोहन देशमुख (Sai Mohan Deshmukh) (१४) हा सायकलने (Cycle) त्याच्या घरी जात होता.

चंद्रभान हॉस्पिटलच्या जवळ जाणता राजा कॉलनी रोड येथे त्याच्या पाठीमागून येणारी बोलेरो गाडी (एम. एच. ३९ जे. ३४१४) हिच्यावरील चालक सम्राट चंद्रकांत पगारे (२७,रा. कळमधरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) याने निष्काळजीपणाने गाडी चालवत सायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात साई हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पगारे हा अपघाताची (Accident) खबर न देता पळून गेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित पगारे याला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून पुढील तपास वपोनी डॉ. सिताराम कोल्हे (Dr. Sitaram Kolhe) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाय. एस. माळी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com