जुलैत चार हजार बाधित; साडेपाच हजार करोनामुक्त

जुलैत चार हजार बाधित; साडेपाच हजार करोनामुक्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाचा (Corona) प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी कमी होताना दिसत आहे. जुलै महिन्यामंध्ये चार हजार पंचवीस नागरिकांना बाधा झाली असून 5 हजार 646 रुग्ण करोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहे. या महिन्यात एकूण 155 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे...

करोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) साधारणपणे फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरू झाली.

मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला. साधारणपणे जिल्ह्यातील लाखो नागरिक या तीन महिन्यात बाधित झाले तर हजारो मृत्युमुखी पडले होते. या काळात रोज हजारो नागरिक बाधित होत होते.

दरम्यान, दुसर्‍या लाटेमध्ये एकाच दिवशी उपचारखाली असलेले सर्वाधिक रुग्ण 48 हजार एवढे होते. हळूहळू हे प्रमाण कमी कमी होत आता एक हजारच्या उंबरठ्यावर येऊन थांबलेले आहे.

लवकरच ही संख्या आणखी कमी होईल असा आशावाद एका बाजूला व्यक्त केला जात असतानाच वैद्यकीय विश्लेषकांनी तिसर्‍या लाटेसंदर्भात (Corona Third Wave) सांगितल्यानुसार त्याची तयारीही केली जात आहे.

करोनाचा धोका कमी होत असला तरी पूर्णपणे टळलेला नाही. नागरिकांनी स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाच्या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. तिसर्‍या लाटेबाबत तयारी होत असली तरी नागरिकांनी स्वतःच्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

- डॉ. अनंत पवार, जिल्हा करोना नोडल अधिकारी, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com