नाशिकमध्ये दिवसभरात ६ हजार ७२६ करोनामुक्त; ४ हजार ८६९ रुग्णांची वाढ

नाशिकमध्ये दिवसभरात ६ हजार ७२६ करोनामुक्त; ४ हजार ८६९ रुग्णांची वाढ
Corona Patients

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये दिवसभरात ६ हजार ७२६ रुग्ण करोनामुक्त झाले असून ४ हजार ८६९ रुग्णांची वाढ झाली आहे. तर जिल्हाभरात आज ३७ रुग्ण दगावले आहेत.

लॉकडाऊन काळ सुरु असून रुग्णसंख्या नियंत्रित करण्यात प्रशासनाला यश आले असले तरीदेखील मृतांची संख्या मात्र वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

आज नाशिक मनपा क्षेत्रात २ हजार ४९८ रुग्णांची वाढ झाली. तर नाशिक ग्रामीणमध्ये २ हजार १६१ रुग्णांची वाढ झाली आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रातही आज ११६ रुग्णांची संख्या वाढली आहे. तर जिल्हाबाह्य ९४ रुग्णांची भर पडल्याने आज आढळून आलेल्या रुग्णांची संख्या पाच हजाराच्या नजीक जाऊन पोहोचली आहे.

जिल्ह्यात आज एकूण ३७ रुग्ण दगावले आहेत. यामध्ये नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात 6, मालेगाव मनपा क्षेत्रात ०३, नाशिक ग्रामीणमधील २८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मृतांची संख्या वाढून ३ हजार ४१९ वर पोहोचली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com