तरूणाच्या खूनप्रकरणी चार संशयित ताब्यात

तरूणाच्या खूनप्रकरणी चार संशयित ताब्यात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ( Ambad police station ) कारगिल चौक ( Kargil Chowk ) भागात काल रात्री एका तरुणास धारदार शस्त्राने भोसकून त्याचा खून (Murder with a sharp weapon ) केला होता. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

फिर्यादी महिला हिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ती महिला दोन मुलांसमवेत सासरी राहत होती. मात्र तिचे दीर सराईत गुन्हेगार असल्याने तिला तेथे राहणे अवघड होत होते. दरम्यान, तिच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी राहुल गवळी (वय 25) या युवकाशी तिची भेट झाली.

या भेटीनंतर गवळी याच्यावर विश्वास वाटल्याने ती गेल्या तीन वर्षांपासून त्याच्यासोबत राहत होती. मात्र ही गोष्ट गवळीच्या नातेवाईकांना व फिर्यादी महिलेच्या सासरच्यांना पटत नव्हती. तिच्या दिरांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने त्यांची परिसरात दहशत होती.

या भीतीपोटी राहुल व या महिलेने तीन-चार वेळा घरही बदलले होते. तिचे सध्याचे राहण्याचे ठिकाण माहीत झाल्याने काही संशयित आरोपी तिथे काल पोहोचले. चर्चा सुरू असताना संशयितांच्या टोळक्याने राहुलला बेदम मारहाण करून त्याच्यावर कोयता व चाकूने वार केले.

या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com