दिंडोरीतील 'त्या' दरोडयाची उकल; आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर जेरबंद

दिंडोरीतील 'त्या' दरोडयाची उकल; आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर जेरबंद

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

ढकांबे (ता. दिंडोरी) येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलीसांना यश आले आहे. आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी कांबे मानोरी शिवारातील शेतकरी रतन शिवाजी बोडके यांच्या मालकीच्या शिवकमल बंगल्यात मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात ६ इरागांनी प्रवेश केला.

बंदूक व चाकूचा धाक दाखवून सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम ८ लाख ५० हजार रुपये असा एकूण १७ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला. त्यावरून दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग कविता फडतरे यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

त्यानंतर ३ वेगवेगळी पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या होत्या. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या पथकांनी वरील गुन्हयातील प्रत्यक्षदर्शीने बघितलेल्या संशयितांच्या वर्णनावरून तसेच इतर पुराव्यांवरून नाशिक शहरातील संशयीत नौशाद आलम फजल शेख (२५, रा. पंचशीलनगर झोपडपट्टी, नाशिक-पुणे रोड, नाशिक) यास रात्रभर पाळत ठेवून ताब्यात घेतले.

दिंडोरीतील 'त्या' दरोडयाची उकल; आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर जेरबंद
पत्नीला प्रसूतीगृहाकडे नेताना कारने घेतला अचानक पेट; दाम्पत्याचा होरपळून मृत्यू

त्याची सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्या नाशिक व मध्यप्रदेश राज्यातील साथीदारांसह त्यांच्याकडील सफेद रंगाची स्विफ्ट डिझायर कार व दुचाकीवर दिंडोरी रोडने ढकांबे-मानोरी परिसरात जाऊन एका अलिशान बंगल्यात दरोडा टाकला. दरोड्यात सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली अशी कबूली दिली.

तसेच शेख याने त्याचे साथीदार रेहमान फजल शेख (रा. राहुलनगर, जेलरोड, नाशिक), इरशाद नईम शेख (रा. संजेरी रो-हाऊस, राजराजेश्वरी मंगल कार्यालय शेजारी, जेलरोड, नाशिक), लखन बाबूलाल कुंडलिया, रवि उर्फ लालू देवीलाल फुलेरी, इकबाल खान फान खान (सर्व रा. रसुलपूर, देवास, जि, देवास, राज्य मध्यप्रदेश), भुरा उर्फ पवन रतन फुलेरी (रा. इंदौर, राज्य मध्यप्रदेश), रिझवान शेख यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

दिंडोरीतील 'त्या' दरोडयाची उकल; आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर जेरबंद
धक्कादायक! शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या

यातील तिघांना पुणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेवून त्यांच्याकडून १६ तोळे वजनाचे ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अजून चार दरोडेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

संशयितांविरोधात धुळे, औरंगाबाद, पुणे, नाशिक आणि मध्यप्रदेशमध्ये दरोडा, जबरी चोरी व चोरी यासारखे मालाविरुध्दचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.

दिंडोरीतील 'त्या' दरोडयाची उकल; आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर जेरबंद
सिन्नर : 'त्या' खुनातील तरुणाला बेड्या; वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून केली होती हत्या

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोउनि अमोल पवार, पोउनि नामा शिरोळे, सपोउनि रविंद्र वानखेडे, पोहया नवनाथ सानप, जालिंदर खराटे, पोना विश्वनाथ काकड, सुशांत मरकड, बाळासाहेब पानसरे, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले, किशोर सानप, मंगेश गोसावी, प्रदिप बहिरम आदींनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com