
बेलगाव कुऱ्हे | प्रतिनिधी | Belgao Kurhe
इगतपुरी तालुक्यात अपघातांची संख्या वाढली आहे. प्रशासनाला अनेकदा सांगूनही अद्याप कुठल्याही प्रकारची उपाययोजना या स्थळांवर झालेली नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे....
आज दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमाराला माणिकखांब (Manikkhamb) गावाजवळ (village) मोटारसायकलला अज्ञात भरधाव वाहनाने कट मारल्याने अपघात झाला. या अपघातात २ महिला, १ पुरुष आणि १ बालिका असे ४ जण जखमी झाले आहेत.
त्यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सर्व अपघातग्रस्त इगतपुरी तालुक्यातील इंदोरे (Indore) येथील आहेत.
एम. एच.१५ ई.एम. ५४०२ ह्या मोटारसायकलवरून रोहिदास हरिभाऊ भांगरे वय ३०, शांताबाई शंकर शेणे वय ६०, सुनिता कैलास साबळे वय ३०, जान्हवी कैलास साबळे वय ७ वर्ष हे घोटीकडून नाशिकच्या दिशेने जात होते.
दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास माणिकखांब गावाजवळ अज्ञात वाहनाने कट मारला. यामुळे झालेल्या अपघातात ते जखमी झाले.
तसेच कालच माणिकखांब येथील एका युवकाला अपघातात आपले प्राण गमावले लागले होते. हे वाढते अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) यांनी दिला आहे.