इगतपुरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा चार जणांना चावा

एक बालक गंभीर
इगतपुरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा चार जणांना चावा

इगतपुरी | Igatpuri

इगतपुरी शहरात एका पिसाळलेलेल्या कुत्र्याने चांगलाच धुमाकूळ घालत चार जणांना चावा घेतला आहे.

यात एका बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. दरम्यान, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाला तक्रार करूनही कुत्र्याचा बंदोबस्त करण्यास नगरपरिषदेणे टाळाटाळ केल्याने अखेरीस काही नागरिकांनीच पुढे येत या कुत्र्याला ठार केले.

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या शिवाजी चौक परीसरात अथर्व पुरुषोत्तम हडकुळे (०६), गणेश सद्गुरू (२०), अनुप मालपाणी (३९), सागर गायकवाड (३५) या चारही जणांना गुुुुरुवारी कुत्र्याने दिवसभरात चावा घेत नागरिकांना हैराण करून सोडले.

यात अथर्व पुरुषोत्तम हडकुळे या बालकाच्या डोक्याला कुत्र्याने गंभीर दुखापत केल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असुन, त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बालकाच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन

अथर्व पुरुषोत्तम हडकुळे ह्या बालकाला कुत्र्याने गंभीरपणे चावा घेतला. त्यामुळे तो गंभीर जखमी झालेला आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलेले आहे. डोक्याची प्लॅस्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. उपचारार्थ जवळपास लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला आहे.

अथर्वची आई धुणीभांडी तर वडील किरकोळ भाजी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने हा खर्च करण्यास ते असमर्थ आहेत.

या बालकाला उपचारासाठी आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. मदत देण्यासाठी किरण फलटणकर अध्यक्ष , जनसेवा प्रतिष्ठान, मो क्रमांक 9225075555 प्रथमेश पुरोहित 738788865 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com