Accident News : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; टायर फुटल्याने कार उलटली

Accident News : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; टायर फुटल्याने कार उलटली

सिन्नर । प्रतिनिधी | Sinner

समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) लोकार्पण झाल्यापासून सातत्याने एक दिवसाआड अपघात (Accident) घडत आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर कारचे टायर फुटून कार थेट नळीत कोसळल्याने चार प्रवासी जखमी (Injured) झाल्याची घटना घडली आहे....

Accident News : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; टायर फुटल्याने कार उलटली
शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले,पवारसाहेब वर्षानुवर्षे...

याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डीकडून मुंबईकडे (Shirdi to Mumbai) जाणाऱ्या कार क्रमांक (एम.एच. ०३ ए.आर. ३८८८) चे टायर फुटल्याने कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट डिव्हायडरवर आदळून पलटी घेत नळीत कोसळली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी कारमधील ४ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात सुरेश सपकाळ (कारचालक) जय शाह, मनिथा शाह, नयना शाह यांचा समावेश आहे.

Accident News : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; टायर फुटल्याने कार उलटली
एका पोस्टमुळे कोल्हापुरात रणकंदन! पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

दरम्यान, अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना (Highway Police) कळताच पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड, हवालदार धकाते, हेमंत मोरे, हरीश पवार, राहुल पगारे, समाधान शिंदे, हवालदार हेमंत मोरे, योगेश डोंगरे, मनोज कोटकर, मनोज साबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून सिन्नरला औषधोपचारासाठी पाठविण्यात आल्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या (Road) कडेला घेवून वाहतूक सुरळीत केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com