इगतपुरी कोविड सेंटरला चार ऑक्सीजन कॉन्सेटंटर मशीन

तैनवाला फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत
इगतपुरी कोविड सेंटरला चार ऑक्सीजन कॉन्सेटंटर मशीन

इगतपुरी । Igatpuri

सध्या कोरोना महामारीचा काळ असुन त्यात कोविड लसींचा तुटवडा भासत आहे. रुग्णांना ऑक्सीजन बेड मिळणे दुरापास्त होत असुन कोविड रुग्णांचे बरेच हाल होतांना दिसत आहे.

या पाश्र्वभुमीवर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य मदतीसाठी पुढे सरसावले असुन गेल्या महिन्याभरापासुन त्यांनी स्वता: व अनेक फाऊंडेशनच्या माध्यमातुन त्यांनी इगतपुरी, भावली, कोरपगांव आदी कोविड सेंटरला ऑक्सीजन सिलेंडर, बेड, जनरेटर, इन्व्हर्टर आदी वस्तुंचा पुरवठा मोफत करत आहे.

आजही त्यांनी इगतपुरी शहराच्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला गोरख बोडके यांच्या माध्यमातुन तैनवाला फाऊंडेशनने दिले ४ ऑक्सीजन कॉन्सेटंटर मशीन पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या हस्ते देण्यात आले.

तसेच एकलव्य कोविड सेंटर येथे २ ऑक्सीजन कॉन्सेटंटर मशीन दिले. या प्रसंगी समाधान नागरे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, उपसरपंच अनिल भोपे, रामदास गव्हाणे, समाधान जाधव, अरूण भागडे, निलेश काळे, विक्रम मुनोत, चंद्रकांत आडोळे, सिधेश्वर आडोळे, योगेश आडोळे, आदिनाथ आतकरी, डॉ. शेळके नाना, डॉ. अक्षय मागाडे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com