जिल्ह्यात चार नवे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सज्ज

जिल्ह्यात चार नवे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सज्ज

सातपूर । प्रतिनिधी Satpur

संभाव्य करोनाच्या Corona तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता उद्योगक्षेत्रातूनही Industrial Sector जोरदार तयारी सुरू आहे. दुसर्‍या लाटेत प्राणवायूची जाणवलेली कमतरता लक्षात घेत प्रशासनाने दिंडोरीतील आक्राळे औद्योगिक वसाहतीत Dindori MIDC व सिन्नर औद्योगिक वसाहतीत Sinnar MIDC प्रत्येकी दोन असे चार ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.

आक्राळे औद्योगिक वसाहतीत उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा 50 मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन गॅस प्रकल्प होणार आहे. दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यामुळे अनेक बळी गेले होते. तिसर्‍या लाटेत ती स्थिती उद्भवल्यास कोविडग्रस्तांचा जीव सुरक्षित राहण्यासाठी सर्वात मोठा प्रकल्प अमोल जाधव यांनी उभारला आहे. त्याची उत्पादनक्षमता प्रतिदिन 50 टनांची आहे.

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी जाधव यांचे दोन मोठे रिफिलिंग प्लँट आहेत.दुसर्‍या लाटेत ऑक्सिजन वाहतुकीचाही प्रश्न होता.जाधव यांच्याकडे यापूर्वी दोन टँकर होते, आता आणखी दोन त्यांनी विकत घेतल्याने चार टँकर झाले आहेत. परिणामी, वाहतुकीचाही प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पात तीनशे टन ऑक्सिजन साठवून ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे चार दिवस ऑक्सिजन निर्मिती ठप्प झाली तरी त्याची कमतरता पडणार नाही. या प्रकल्पाला एमआयडीसीने आक्राळे येथे तीन एकर जागा दिली आहे.

दुसरा प्रकल्प ऑक्सिजन सिटी या कंपनीचा आहे. नाशिकमधील काही डॉक्टरांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केली आहे. या प्रकल्पाची क्षमता 15 मेट्रिक टन आहे. याशिवाय, सिन्नर एमआयडीसीमध्ये टावरी मल्टिगॅसेस आणि अंश इंजिनीअरिंग असे दोन प्रकल्प सुरू होत आहेत. या सर्व चार नव्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना परवानगी देण्यात आली असून, सुमारे 80 टन अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.

पन्नास कोटींपर्यंत अनुदान

50 मेट्रिक टनांपर्यंतचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार्‍या उद्योगांना उद्योग विभागाकडून 50 टक्के सवलतीत जागा मिळण्यासह सुमारे 50 कोटींपर्यंत अनुदान मिळणार आहे. पुढील सात वर्षांत ते टप्प्या टप्प्याने मिळणार आहे.

दिंडोरी औद्योगिक क्षेत्रात 50 मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारणी सुरू आहे. जागा ताब्यात घेतली असून, लगेच काम सुरू होईल. मार्चपर्यंत प्रकल्प कार्यान्वित होईल.

अमोल जाधव, ऑक्सिजन उत्पादक

Related Stories

No stories found.