मनपाच्या नव्या चार नर्सरी सुरू

मनपाच्या नव्या चार नर्सरी सुरू

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिकेची संपूर्ण शहरात एकच नर्सरी (Nursery) असल्याने महापालिकेने आता नव्याने चार नर्सरी सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर अजून दोन ठिकाणी नर्सरी सुरू करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. या नर्सरीमधून नागरिकांना पाहिजे त्या रोपांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांना चांगल्या पद्धतीने वृक्षारोपणासाठी (tree plantation) रोपे मिळावीत, या उद्देशाने महापालिकेने नाशिक रोड (nashik road) येथील जेतवन नर्सरी बरोबरच नाशिक पश्चिम विभागात शिवाजी उद्यानात (Shivaji Park) तर सातपूर (satpur) येथे कानेटकर उद्यानात आणि मधुबन कॉलनी या पंचवटी विभागात नव्याने नर्सरी सुरू केल्या आहे. त्याचबरोबर नाशिक पूर्व आणि नवीन नाशिक विभागात सुद्धा नर्सरी उभारण्याच्या दृष्टीने जागेचा शोध सुरू केला आहे.

शहरातील सहाही विभागात या नर्सरी सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या उद्यान विभागाच्या (Department of Parks) वतीने गंगापूर रोड परिसरातील धोकादायक वृक्ष हटवण्याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतु याला न्यायालयीन प्रक्रियेची अडचण निर्माण झाल्याने हे काम सध्या थांबवण्यात आले आहे.

तसेच आरटीओ कार्यालयाजवळ (RTO Offices) दोन मोठे वृक्ष पडले असल्याने हे वृक्ष नव्याने रिप्लायटिंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उद्यान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. हे वृक्ष नव्याने उभारण्यासाठी जागेचा शोधही सुरू असून याबाबतचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले आहे.

एक लाख झाडे कधी लागणार?

महापालिकेची एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही याबाबत आता साशंकता निर्माण होऊ लागली आहे. महापालिकेने एक लाख वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु अद्याप किती वृक्षांची लागवड झाली याबाबतची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर पुणे येथून केवळ 1400 रोपे प्राप्त झाले असून अजून दहा ते बारा हजार रोपे घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. पुणे येथून महापालिकेला पिंपळ, ताम्हण, कडुलिंब आणि पेरू अशी रोपे प्राप्त झाली आहेत. परंतु एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट महापालिका कशा प्रकारे पूर्ण करणार याकडे आता लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com