जिल्ह्यात आढळले चार करोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आढळले चार करोना पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ४ रुग्णांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात २ रुग्णांनी करोनावर मात केली आहे...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. दोन रुग्ण नाशिक मनपा (Nashik NMC) क्षेत्रातील, तर नाशिक ग्रामीण (Nashik Rural) आणि जिल्हा बाह्य प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

Related Stories

No stories found.