इगतपुरी
इगतपुरी
नाशिक

इगतपुरी : नांदगावसदो येथे आढळले बिबट्याचे चार बछडे

परीसरात घबराट

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी | Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथे १५ दिवसांचे चार बछडे आढळून आले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नांदगाव व तळेगाव शिवारमधील एका बंद घरात हे बछडे सापडले आहेत. घराचा मालक बंद घरात ठेवलेली लाकूड घेण्यासाठी घरी आल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. त्यांनी त्वरित ही माहिती ग्रामस्थांना देत वनविभागाला कळवण्यात आली.

माहिती मिळाल्यानंतर वन अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणाची पाहणी केली. साधारण १५ दिवसांचे बिबट्याचे चार बछडे असून आईबरोबर पुन्हा एकत्र येण्यासाठी वनविभाग प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, बिबट्याच्या पिल्लांना पाहण्याासाठी गावातील लोकांनी गर्दी केली होती. यावेळी वन अधिकार्‍यांनी गर्दीला याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बछड्याची आई परत येईपर्यंत ते पिल्लांवर लक्ष ठेवणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com