चार लाख ज्येष्ठ लसीकरणााच्या प्रतीक्षेत

फेस्कॉमचा उपोषणाचा इशारा
चार लाख ज्येष्ठ लसीकरणााच्या प्रतीक्षेत

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यातील पाच लाखा पैकी एक लाखच जेष्ठांचे (Vaccination of seniors) आता पर्यंत लसीकरण झाले असुन चार लाख ज्येष्ठ लसीकरणााच्या प्रतीक्षेत (Waiting For Vaccination) आहेत.

सकाळी सात पासुन रांंगा लावुनही लस मिळेलच याची शाश्‍वती नसल्याने फेस्कॉमने (FESCOM) आता उपोषणाचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन महिन्यापासुन शहरात लसीकरण सुरु आहे. पहिल्या टप्प्यात (First Step Of Vaccination) जेष्ठांना लस देण्याचे ठरले. मात्र ऑनलाईन नोंदणी (Online Registration) करणे अनेकाना जमले नाही, ज्यांना जमले त्यांनी लस घेतली. आता सकाळी सात पासुन जेष्ठ नागरीक लसीसाठी सरकारी रुग्णालयात (Government Hospital) रांंगा लावतात.

तेथे दुपार बारा एक नंंतर त्यांंना लस मिळते. या पाच-सहा तासात त्यांना साधे पाणी मिळत नाही. भुक लाागल्याने मधुमेहींना त्रास होतो. अगोदर वृध्ध्दापकाळामुळे त्यांना आजाराने ग्रासलेले असते. सतत लघवीचा त्रास होतो.

मात्र या ज्वलंत शारीरीक समस्यांकडे कोणत्याही सरकारी (Primary Facility) रुग्णालयात लक्ष दिले जात नाही. प्रसार माध्यमातून फक्त लसीकरण करुन घ्या, असे म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) येऊन पाहील्यास परिस्थिती बिकट दिसते.

नाशिकचे महापैर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni), उपमहापौर भिकुबाई बागुल हे दोघेही जेष्ठ आहेत. त्यांंना ज्येष्ठांचे प्रश्‍न चांगले ज्ञात आहेत. म्हणुनच त्यांच्या कारकिर्दीत तरी जेष्ठांची परवड होऊ नये अशी त्यांंची अपेक्षाा आहे. त्यांंच्याकडुन खुप अपेक्षा आहे.

या महिन्यात महापालिकेने (NMC Nashik) यात लक्ष न घातल्यास पुढील महिन्यात थेट जिल्हाधिकारी कार्यालया (Collector Office) समोर उपोषण करु असा इशारा फेस्कॉमचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव तांंबे यांंनी दिला आहे.

स्मार्ट नाशिक करत असताना अगोदर जेष्ठांना स्मार्ट सुविधा द्या, सरकारी लसीकरण केंद्रावर उन वारा पावसा पासुन संरंक्षण होईल एवढी तरी सुविधा करा, सर्वच जेष्ठ खासगी रुग्णाालयात एक दिड हजार रुपये खर्च करुन लस घेऊ शकत नाही याची तरी जणिव ठेवा.

- उत्तमराव तांबे, अध्यक्ष फेस्कॉम नाशिक

लसीकरण केंद्रावर उन, वारा पावसापासुन संंरक्षण होईल अशी व्यवस्थाा हवी. ज्ये़ष्ठ नागरीकांंसांठी ठरावीक दिवस , ठऱावीक केंद्र निश्‍चीत करावाीत. शारीरीक व्याधींंचा विचार करता प्रसाधनाची, शुध्द पाण्याची सोय करावी, निवडणुक काळात जसे घरोघरी जाऊन विनवण्या करतात तसे आता नगरसेवकांना आपल्या प्रभागातील सर्व जेष्ठांचे लसीकरण करुन घ्यावे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com