केटीएचएमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना चार लाखांची शिष्यवृत्ती

केटीएचएमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना चार लाखांची शिष्यवृत्ती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चेन्नई येथील हेल्प द ब्लाइंड (Help the blind) संस्थेकडून केटीएचएम महाविद्यालयातील (KTHM College) ३८ दिव्यांग विद्यार्थ्यांना (Blind students) ३ लाख ८० हजार रुपयांची शिष्यवृत्ती (Scholarship) प्रदान करण्यात आली...

हा कार्यक्रम केटीएचएम महाविद्यालयात पार पडला. याप्रसंगी हेल्प द ब्लाइंड संस्थेचे नाशिक विभागाचे समन्वयक व्ही. डी. सावकार (V. D. Savkar), प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड (Dr. V. B. Gaikwad), दत्तात्रय कडवे (Dattatraya Kadave), प्रा. चेतन शिरोरे (Chetan Shirore) आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. गायकवाड म्हणाले की, हेल्प द ब्लाइंड संस्था नेहमीच विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून पाठबळ देत असते. विद्यार्थीदेखील या मदतीचे भान ठेऊन विविध क्षेत्रात आपले व महाविद्यालयाचे नाव उंचावेल अशी कामगिरी करीत असतात.

सावकार म्हणाले की, सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांनाही उत्तम शिक्षण देऊन चांगल्या संधी प्राप्त करून द्याव्यात या उद्देशातून हेल्प द ब्लाइंड संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी मदत केली जाते. संस्थेच्या विविध योजना व कामांची माहिती देऊन शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन त्यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com