नाशिक | Nashik

तालुक्यातील खुंटावस्ती येथील पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियास चार लाखांची मदत करण्यात आली आहे.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर चे आमदार हिरामण खोसकर यांच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली. तालुक्यातील

मुरंबी ग्रामपंचायत पैकी खुटावस्ती येथील शिवराम खुटाडे हे काही दिवसांपूर्वी पुराने वाहुन गेले होते. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांवर शोककळा पासरली होती.

आज शुक्रवारी ( दि.०९) आमदार खोसकर यांनी भेट देत चार लाख रुपयांची कुटुंबाला मदत देण्यात आली.

यावेळी संपत सकाळे, तहसिलदार गिरासे, तलाठी खोडे तात्या, पखाने पाटील मुरंबी सरपंच आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.