चारशे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध : कृषीमंत्री भुसे

चारशे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध : कृषीमंत्री भुसे

मालेगाव । प्रतिनिधी

मालेगाव शहर व तालुक्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यासंदर्भात व एकंदरीत वितरणसंदर्भात कृषिमंत्री दादा भुसे यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय नाशिक येथे भेट दिली असता सहआयुक्त (औषधे) दुशांत भामरे, सहाय्यक आयुक्त (औषधे) माधुरी पवार उपस्थित होते. मालेगाव शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा व सदर इंजेक्शनच्या झालेल्या काळ्या बाजाराबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी खडेबोल सुनावले.

मालेगाव शहरात रेमडिसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने तातडीने मालेगाव शहरास सदर इंजेक्शन पुरवावे, असे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले. त्यानुसार मालेगाव शहरासाठी आज 400 रेमडिसीव्हर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. सदर इंजेक्शन सामान्य रुग्णालय, महापालिकेचे कोविड हॉस्पिटल तसेच शहरातील कोविड हॉस्पिटल यांना 400 रेमडिसीव्हर इंजेक्शन देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

तसेच पुढील आठ दिवसांत आठ ड्युरा सिलिंडर मालेगाव सामान्य रुग्णालय येथे उपलब्ध होणार असल्याने ऑक्सिजनची समस्या काहीअंशी सुटण्यास मदत होणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. शहरात 400 रेमडेसिवीर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com