चौघे जुगारी जेरबंद

चौघे जुगारी जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जुने नाशिक परिसरातील पाटकरी लॉजच्या बाजूच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत भद्रकाली पोलिसांनी चार जुगारींच्या मुस्क्या आवळल्या...

आनंद प्रभाकर थोरात (४८, रा. इंदिरानगर), तौफिक लतीफ शेख (४९, रा. खडकाळी, भद्रकाली), विजय बाबाराम निकम (५१, रा. शिवाजी चौक, कथडा, भद्रकाली) व रवी जयप्रकाश मिश्रा (४७, रा. कृष्णाजी टॉवर, पंचवटी कारंजा) अशी अटक करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटकरी लॉजच्या बाजुला जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून जुगारींना ताब्यात घेतले.

त्यांच्या कडून २ हजार २६० रूपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटील करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com