अपघात
अपघात
नाशिक

पिकअप-दुचाकी अपघातात चारजण जागीच ठार

तीन वर्षाच्या चिमुकल्यासह दाम्पत्य ठार

Gokul Pawar

Gokul Pawar

पंचवटी । panchvati

भरधाव जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत चारजण जागीच ठार झाल्याचे आज (दि.१३) दुपारी ३ वाजेदरम्यान मखमलाबाद-मातोरी रस्त्यावर घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान ओझर येथून दुचाकीवरून (एम.एच.१५ सीएल २९८८) चौघे मखमलाबाद-गिरणारे मार्गाने आपल्या घरी जात असताना समोरून आलेल्या पीकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पती पत्नीसह आणि ३ वर्षीय मुलासह इतर एक असे चौघे जागीच ठार झाले आहेत. दिलीप नामदेव दिवे(२५) रा. ओझरखेड तर केशव खोडे (३५), मीराबाई केशव खोडे(३०), अनिल केशव खोडे(३) (सर्व सापगाव ता. त्र्यंबकेश्वर ) अशी मृतांची नावे आहेत. अपघात झाल्यानंतर वाहनचालकाने अपघातग्रस्त वाहन सोडून पलायन केले.

स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती तत्काळ म्हसरूळ पोलीस स्थानकात दिली. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.तसेच पोलिसांनी फरार जीपचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व शेतमजूर असून या अपघातात अवघ कुटुंब गेल्याने परिसरात हळहळ

Deshdoot
www.deshdoot.com