येवल्यात जनता संचारबंदीचा निर्णय

08 मे पासून 11मे पर्यंत जनता संचार बंदी
येवल्यात जनता संचारबंदीचा निर्णय
करोना

येवला । प्रतिनिधी

करोनाच्या दुसर्‍या लाटेत झपाट्याने वाढत असलेली रूग्णसंख्या व वाढत असलेले मृत्यूचे प्रमाण पहाता अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या आवाहनानुसार 08 मे ते 11 मे असे चार दिवस येवला येथे जनता संचारबंदी पाळण्यात येणार आहे.

जनता कर्फ्यु लावण्यात यावा यासाठी येवला नगरपरिषदेच्या सभागृहात येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सर्वपक्षीय कार्यकर्ते व्यापारी असोसिएशन, मेडिकल, भाजीपाला, फळे व इतर सर्व संघटनाचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे हेही उपस्थित होते.

येवला शहर व तालुक्यात 08 मे ते 11 मे दरम्यान चार दिवसांची जनता संचारबंदी लावण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. 7 मे च्या रात्री 8 वाजेपासून 12 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत जनता संचारबंदी सुरु असणार आहे. जनता संचारबंदी कालावधीत शहरातील दवाखाने, मेडिकल पाणी जार व दुध विक्री वगळता भाजीपाला, किराणा, फळे व इतर सर्व व्यवसाय बंद असणार आहेत. येवला शहरातील नागरिकांनी आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. जनता संचारबंदी संपल्यावर शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन पूर्वीप्रमाणे सुरू राहील करोनाचा प्रादुर्भाव मृत्यूचे थैमान थांबवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीला नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, बाळासाहेब लोखंडे, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, गटनेते प्रवीण बनकर, रुपेश लोणारी, दयानंद जावळे, प्रमोद सस्कर, राजुभाऊ लोणारी, निसार अहेमद, सगीर अहेमद, भोलानाथ लोणारी, सफिक शेख, निसार लिंबुवाले, किराणा, मेडिकल असोसिएशन, व्यापारी महासंघ राजेश भंडारी, दत्ता निकम, दिनेश मुंदडा, दीपक लोणारी, विजय श्रीश्रीमाळ यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com