साडेचार कोटींची रस्त्यांची कामे रद्द; हे आहे कारण...

साडेचार कोटींची रस्त्यांची कामे रद्द; हे आहे कारण...
file photo

नाशिक ।प्रतिनिधी Nashik

रस्त्याच्या कामांचा कार्यारंभ आदेश नाही, विहित मुदतीत निविदा प्रसिध्द न करणे, कामे वेळेवर सुरू न करणे अशा विविध कारणांचा ठपका ठेवत आदिवासी विभागातंर्गत लेखशिर्ष ३०५४ अतंर्गत मंजूर झालेल्या तब्बल चार कोटी ६५ लाख रुपयांच्या ३६ रस्त्यांची कामे शासनस्तरारून रद्द करण्यात आली आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी (Igatpuri), पेठ (Peth),दिंडोरी (Dindori) तालुक्यातील रहिवाशांना याचा फटका बसणार आहे.... (Four crore sixty fiver lakh road work canceled due to government instruction)

आदिवासी विभागाने (Tribal Development Dept) ३६ रस्त्यांची कामे रद्द करत, प्रशासनासह लोकप्रतिनिधींना हा निर्णय घेऊन चांगलाच दणका दिला आहे. मार्च एण्डींगच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त प्रशासकीय मान्यता देऊन मंजूर केलेल्या कामांचाही यामध्ये समावेश आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी उपाययोजनेतंर्गत (लेखाशीर्ष ३०५४) रस्त्यांची कामे मंजूर केली जातात. साधारणता मार्च एण्डींगच्या घाईगर्दीत पदाधिकारी, सदस्य, लोकप्रतिनिधींची पत्रे घेऊन काही ठराविक ठेकेदारांनी लॉबी करत थेट मंत्रालयातून कामे मंजूर करून आणली. नियमित नियोजनात ही कामे कायम करण्याचा डाव असतो. मात्र, गत दोन वर्षापासून दायित्व असल्यामुळे या विभागाला निधीच नसल्याने नियोजन झालेले नाही. त्यामुळे या कामांना निधी नसल्याने त्यांची निविदा काढण्यात आली नाही.

काही कामांच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र, त्या निविदास्तरावरच आहे. या कामांना निधी देऊ नये , अतिरिक्त प्रशासकीय मान्यता रद्द करा, अशी मागणी सदस्यांनी करत सभेत ठरावच केला होता. यावर प्रशासनाने निधी उपलब्ध झाल्यास ही कामे करण्यात येतील, अशी सावध भूमिका घेतली होती. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर, शासनाने अनेक विभागाच्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला. यात शासनाने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील प्रलंबित असलेल्या कामांपैकी अद्याप कार्यादेश न दिलेली कामांची यादी मागविली.

यात नाशिक जिल्हा परिषदेतील (Nashik Zilla Parishad) ३६ कामे ही निविदास्तरावर असल्याचा अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे आदिवासी विभागाने निविदास्तरावर असलेल्या ४ कोटी ६५ लाखांची ३६ कामे रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. रद्द करण्यात आलेली कामे ही इगतपुरी (Igatpuri), पेठ (Peth) व त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) या तीन तालुक्यातील आहेत. ही काम रद्द झाल्याने ठेकेदारांना चांगला दणका बसला असून ग्रामीण भागात रस्ते हिणार नसल्याने ग्रामस्थांच्या होणाऱ्या रोषाला हे सामोरे जावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com