चोरट्यांचा मोर्चा आता बैलांकडे; नाशकात एकाच दिवशी 'इतके' बैल चोरीला

फाईल फोटो
फाईल फोटो

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी बैल चोरीच्या घटना घडल्या. या दोन्हीही घटनांत चार बैल चोरट्यांनी पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे... (Four bulls stolen in nashik city area)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आयुक्तालयाच्या हद्दीत पंकज रामदास कदम ( ४८,रा. देवीमंदिरासमोर रेस्ट कॅम्प रोड देवळाली कॅम्प (Deolali Camp) नाशिक )यांच्या शेतातील गोठयातून अज्ञात चोरट्यांनी काळ्या रंगाचा सफेद टीपके असलेला व काळ्या रंगाचा मध्यम शिंगे असलेला असे एक लाख रुपये किमतीचे दोन बैल चोरून नेल्या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसऱ्या घटनेत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या (Trimbakeshwar Police Station) हद्दीत अंबोली गावात (Amboli Gaon) झुंबर चिमाजी कड ( ६३,रा.अंबोली तालुका त्र्यंबकेश्वर जि. नाशिक ) यांच्या गोठयातून सफेद व त्यावर काळे ठिपके असलेला व सफेद रंगाचा व तोंडास भुरकट रंगाचा असे ७० हजार रुपये किमतीचे डांगीव जातीचे दोन बैल चोरून नेल्याप्रकरणी त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास आहिरे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com