'नो हेल्मेट नो पेट्रोल', कर्मचाऱ्यास चौघांची मारहाण

'नो हेल्मेट नो पेट्रोल', कर्मचाऱ्यास चौघांची मारहाण

पंचवटी | Panchavti

नाशिक शहरात 'नो हेल्मेट नो पेट्रोल' (No Helmet No Petrol) ही मोहीम पोलीस आयुक्त दिपक पांड्येय (Commissioner Of Police Dipak Pandey) यांनी सुरू केलीआहे.

दिंडोरी रोड वरील (Dindori Road) इच्छामणी पेट्रोल पंपावर ( Petrol Pump) हेल्मेट नसलेल्या दुचाकी स्वारास पेट्रोल न दिल्याच्या वादातून पंपावरील कर्मचाऱ्यास चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघा विरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,

दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोलपंपावर बुधवारी (ता. १८) रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास चार अनोळखी युवक आले. पंपावरील कर्मचारी ज्ञानेश्वर पोपट गायकवाड (वय २४, रा. चाचडगाव ता. दिंडोरी जि. नाशिक) यांच्याकडे पेट्रोल मागितले. त्यावेळी गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार हेल्मेट नसल्याच्या पेट्रोल मिळणार नाही, असे सांगितले. याहून संशयित व पंप कर्मचारी सोबत वाद झाला.

संशयितांना राग आल्याने वाईट-साईट शिवीगाळ सुरू केली. संशयित चौघांनी पंप कर्मचाऱ्यास मारहाण केली. त्यांपैकी एका संशयिताने रस्त्यावर पडलेला दगड फेकुन मारुन गंभीर दुखापत केली. याप्रकरणी मिलींद विवेक कुलकर्णी (३६, रा. महात्मानगर) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेत चौघा अज्ञात संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी चौघा अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. लागलीच तपासाची चक्रे फिरविली काही तासातच म्हणजेच गुरुवारी पहाटे साडे चारच्या सुमारास तिघा संशयितांना अटक केली आहे. यातील एक संशयित हा बदलापूर असुन त्यास अटक करणार आहेत.

"पोलिस आयुक्तानी घेतली दखल"

पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांना म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. गुरूवार (ता.१९) रोजी सकाळी साडे अकरा वाजता इच्छामणी पेट्रोल पंप भेट दिली.

यावेळी पंप कर्मचाऱ्यांची चौकशी केली व त्याचे मनोबल वाढविले. यावेळी माध्यमांशी संवाद साधना त्यात ते म्हणाले की, नो हेल्मेट नो पेट्रोल ही महत्वकांशी उपक्रम आपण सुरू केला आहे. सुरुवातीला १० ते २० टक्के नागरिकानी प्रतिसाद दिला होता. आता तो ५० ते ६० टक्के पर्यंत पोहचला आहे. नवीन संकल्पना असल्याने जनसामान्य मध्ये पोहचण्यास थोडा वेळ लागेल. परंतु नाशिक करांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे. उपक्रम सुरू असेपर्यंत पेट्रोल पंपचालकांना पोलिस सुरक्षा दिली जाईल.पंप चालक व पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांना कायदेशीर कारवाई होणार.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com