'ते' चौघे हल्लेखोर जेरबंद

रेल्वे पोलीस पथकाची कामगिरी
'ते' चौघे हल्लेखोर जेरबंद

मनमाड । प्रतिनिधी Manmad

भाऊबीजच्या (bhaubij) दिवशी मनमाड रेल्वे स्थानकावर (Manmad railway station) शिवम पवार या तरुणाची निर्घुणपणे हत्त्या करून फरार झालेल्या चौघा हल्लेखोरांच्या रायगडजवळ (raigad) असलेल्या नराळे येथून मुसक्या आवळण्यात रेल्वे पोलिसांना (Railway Police) यश आले आहे.

या चौघांना आज न्यायालयात हजर केले असता पांच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिली. अवघ्या चार दिवसात पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून गजाआड केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. चांदवड तालुक्यातील (chandwad taluka) उसवाड येथील शिवम पवार याचे सुमारे दीड वर्षा पूर्वी उल्हासनगर (Ulhasnagar) येथील एका तरुणी सोबत इंस्टाग्रामवर (Instagram) ओळख झाल्यानंतर या दोघामध्ये प्रेम संबंध निर्माण होऊन ते एकमेकांना भेटू लागले होते.

दरम्यानच्या काळात सदर तरुणी सोबत इतर मुलांची ओळख असल्यामुळे तिचे त्यांच्या सोबत संबंध असल्याचा संशय शिवमला झाला या संशयावरून त्याचे या मुलां सोबत फोनवर भांडण देखील झाले होते. या वादातून शिवमने चेतन आणि मोहित नावाच्या तरुणांच्या नावाने इंस्टाग्रामवर फेकआयडी (FakeID) करुन त्यांचे अश्लिल फोटो टाकले येथून वाद वाढत गेला.

हा वाद मिटविण्यासाठी सदर तरुणीसह तिचे चौघे मित्र मनमाडला आले येथे शिवम देखील आला मात्र वाद मिटण्याऐवजी तो इतका विकोपाला गेला कि चौघांनी रेल्वे स्थानकाच्या प्लॉट फार्म 3-4 च्या मधोमध असलेल्या गार्डनजवळ शिवमवर चाकूने वार करून त्याची हत्त्या केली आणि नंदीग्राम एक्स्प्रेसने (Nandigram Express) मुंबईकडे फरार झाले होते. भाऊबीजच्या दिवशी आणि प्रवाशां समोर ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपाधीक्षक दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शरद जोगदंड यांनी महेंद्र पाटील, संतोष भालेराव, प्रमोद जाधव, सागर पेठे यांचे एक पथक मुंबईला पाठवले होते. तीन दिवसापासून हल्लेखोरांचा शोध घेत असलेल्या पथकास हल्लेखोर रायगडच्या नराळे भागात असल्याची गुप्त माहिती मिळताच या पथकाने सापळा रचून चेतन मोधळे (वय 19), मयूर कराळ े(वय 20), निशांत जमधाडे (वय 19 तिघे रा. कर्जत) व मोहित सुकेजा (वय 18 रा.उल्हासनगर) या चौघांना ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com